पनवेल ः रायगड जिल्ह्यात रविवारी 122 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. 31 रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात 62, पनवेल ग्रामीणमध्ये 22, रोहा 10, पेण नऊ, महाड पाच, माणगाव चार, उरण चार, अलिबाग तीन आणि खालापूरमध्ये तीन नवीन रुग्ण आढळले. रायगडात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2418 झाली असून 98 जणांचा मृत्यू झाला आहे. कळंबोली सेक्टर 4 ई येथील एका व्यक्तीचा व पनवेल कच्ची मोहल्ल्यातील तसेच अलिबागमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात रविवारपर्यंत 6620 टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी 2418 पॉझिटिव्ह आल्या आहेत. 99 टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. 1582 जणांनी कोरोनावर मात केली असून 738 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …