![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2020/06/98c274-1024x829.jpg)
मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मानव अधिकारी संघटना मुरूड यांनी आतापर्यंत सुमारे 3000पेक्षा जास्त मास्क वाटपाचा निर्धार आणि मनाशी खूणगाठ बांधून पावले उचलली आहेत. यामध्ये मुरूड परिसरातील विविध सार्वजनिक कामकाजाची दुकाने, कार्यालये, भाजीमार्केट, घरोघरी व विविध ठिकाणी मास्क वाटप करण्यात आले. गुरुवारी भोगेश्वर पाखाडी येथे मानव अधिकारी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी, इम्यिताज गोलंदाज, अल्पेश रणदिवे, अंकीत गुरव आदींनी घरोघरी मास्क वाटप केले. या उपक्रमाबद्दल मानव अधिकारी संघटनेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.