Breaking News

ग्राहकांची वीज बिले कमी करून सुधारित द्या!

उरण भाजपचे महावितरणला निवेदन

उरण : वार्ताहर – भाजपच्या वतीने बुधवारी (दि. 1) महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीला नागरिकांना आलेले वीज बिल कमी करावे व सुधारित देयके नागरिकांना देण्यात यावीत या मागणीसाठी उरण भाजप कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. हे निवेदन उरणचे आमदार महेश बालदी यांच्या सूचनेप्रमाणे उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर व उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे उरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिदास चोंडे यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी देशासह राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊन असल्याने या काळात मीटर रीडिंग न घेता अंदाजे देयके तीन महिने वीज वितरण कंपनीकडून देण्यात आली. सध्या वीज बिले हि अव्वाच्या सव्वा आल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विजेच्या बिलाविषयी आपल्याकडून वीज ग्राहकांचे प्रश्न सोडविले जात नाहीत तोपर्यंत वीज देयकांची वसुली पूर्णपणे स्थगित करावी. तसेच कोणत्याही नागरिकाचे वीज कनेक्शन पुढील तीन महिने कूपन नये व ग्राहकांना रीडिंगप्रमाणे देयके देऊन दिलासा द्यावा.

उरण तालुक्यातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होत असून पुढील काही दिवस सणासुदीचे असल्याने नागरिकांना याचा त्रास होऊ नये यासाठी आपण जाणीवपूर्वक लक्ष देऊन जनतेला दिलासा द्यावा. या प्रकरणाची आपल्याकडून गंभीर दाखल न घेतल्यास भारतीय जनता पक्ष उरण तालुक्यातर्फे महावितरणच्या कारभाराविरुद्ध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

उरण तालुका महिला उपाध्यक्ष निर्मला घरत, नगरसेविका रजनी कोळी, स्नेहल कासारे, उरण शहर युवा अध्यक्ष निलेश (जयहरी) पाटील, जसखार सरपंच दामुशेठ घरत, उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, उरण तालुका उपाध्यक्ष पंडीत घरत, भूपेन घरत, उरण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, उरण तालुका युवा अध्यक्ष शेखर पाटील, उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, कुलदीप नाईक, गिरीश पाटील, हेमंत भोंबले, माजी सरपंच वेश्वी अजित पाटील, भाजपा पागोटे गावअध्यक्ष विजय पाटील, मनोहर सहतीया, मनन पटेल, सागर मोहिते, स्वप्नील पाटील, कुंदन गायकवाड, हितेश शाह, शेखर म्हात्रे, प्रवीण घासे, जयराज कोळी, प्रसाद पाटील, अजित पाटील,

निलेश पाटील आदींनी निवेदन देताना पाठिंबा दिला.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply