Breaking News

वादळग्रस्तांचा निधी बँकेत जमा; नागरिकांची मोठी गर्दी

मुरूड ः प्रतिनिधीे

मुरूड तालुक्यातील वादळग्रस्तांना शासनातर्फे त्यांच्या झालेल्या नुकसानीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने लोकांनी बँक ऑफ इंडियाच्या मुरूड शाखेत आपले पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. बुधवारी बँक ऑफ इंडियामध्ये एकदरा ग्रामपंचायतमधील असंख्य लोकांची गर्दी दिसून आली. 

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मुरूड तहसील कार्यालयास पूर्ण व अल्प नुकसान झालेल्या घरांसाठी 16 कोटी 89 लाख रुपये प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 14 हजार 846 लोक लाभार्थी आहेत. त्यापैकी आतापर्यंत सात हजार 687 लोकांना पाच कोटी 90 लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत.  बागायत व फळबागांसाठी तीन कोटी 22 लाख रुपये प्राप्त झाले आहेत. 425  लाभार्थ्यांना आतापर्यंत 36 लाख तीन हजार 500 रुपये वाटप करण्यात आले आहेत. संचारबंदीच्या काळात लोकांकडील पैसे संपले आहेत. अशा वेळी निसर्ग चक्रीवादळामुळे लोकांच्या घराचे छप्पर उडाले होते. त्यामुळे छप्पर पूर्ण करण्यासाठी उसनवारी पैसे घेऊन लोकांनी आपले घर पूर्ण केले होते.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply