Breaking News

नागोठण्यात आषाढी एकादशी उत्साहात

नागोठणे ः प्रतिनिधी

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार बुधवारी (दि. 1) येथील ज्ञानेश्वर मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटे चार वाजता काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पहाटे पाच वाजता सरपंच डॉ. मिलिंद धात्रक आणि डॉ. मिताली धात्रक तसेच श्री. व सौ. विजय पिंपळे या दोन दाम्पत्यांच्या हस्ते विठ्ठल- रखुमाईच्या मूर्तींवर महाअभिषेक करण्यात आला.

या वेळी दोन्ही दाम्पत्यांच्या वतीने विठूरायाला जगभरातील कोरोनाचे संकट नाहीसे कर, असे साकडे घालण्यात आले. सकाळच्या पूजेनंतर पोलिसांच्या आदेशानुसार दिवसभर मंदिर बंद ठेवण्यात आले होते.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply