Breaking News

प्रवीण कुमारची ‘रौप्य’उडी

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा दबदबा

टोकियो ः वृत्तसंस्था

टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील भारतीय चमूची ड्रीमरन सुरू असून शुक्रवारी (दि. 3) उंच उडी प्रकारामध्ये प्रवीण कुमारने रौप्यपदक जिंकले. पुरुष उंच उडी टी 64 प्रकारामध्ये प्रवीणने ही कामगिरी केली. यासह त्याने आशियाई विक्रम स्वतःच्या नावे केला आहे.

ग्रेट ब्रिटनच्या जॉनथन ब्रूम एडवर्ड्स आणि प्रवीणमध्ये सुवर्णपदकासाठी अगदी अटीतटीची लढत पाहायला मिळाली. पहिल्या प्रयत्नात प्रवीणने 1.88 मीटरची उडी मारत पहिले स्थान पटकावले. नंतर दुसर्‍या प्रयत्नात त्याने 1.93 मीटरची उडी मारली. तिसर्‍या प्रयत्नात प्रवीणने 1.97 मीटरची उडी मारली. त्याला ब्रिटनच्या एडवर्ड्सने आणि पोलंडच्या मिसीज लिपिएटोने कडवी झुंज दिली. पुढील प्रयत्नात प्रवीण आणि लिपिएटो दोघांनी 2.04 मीटर उडी मारली. त्यापाठोपाठ एडवर्ड्सनेही ही कामगिरी करीत पदकासाठीची चुरस आणखी वाढवली. पुढे प्रवीणने 2.07 मीटरची उडी मारत आशियाई विक्रम स्वतःच्या नावे केला. अंतिम पदकासाठी एडवर्ड्स आणि प्रवीण यांच्यामध्ये चुरस रंगली, मात्र येथे एडवर्ड्सने 2.10 मीटर उडी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply