दोघांचा मृत्यू; 157 रुग्णांची कोरोनावर मात
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 11) कोरोनाचे 223 नवीन रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 157 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका 169 नवीन रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 119 रूग्ण बरे झाले आहे. ग्रामीणमध्ये 54 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून 38 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
पनवेल महापालिका हद्दीत कळंबोली अमरदीप सोसायटीत आणि तळोजा मध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 28 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 627 झाली आहे. कामोठेमध्ये 21 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 832 झाली आहे. खारघरमध्ये 22 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 717 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 47 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 597 झाली आहे. पनवेलमध्ये 37 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 716 झाली आहे. तळोजामध्ये 14 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 191 झाली आहे. महापालिका क्षेत्रात एकूण 3680 रुग्ण झाले असून 2222 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 60.38 टक्के आहे. 1364 रुग्णांवर उपचार सुरू असून 94 जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांत उलवे 11, पाले बुद्रुक पाच, आदई चार, आकूर्ली चार, करंजाडे, विचुंबे, आजीवली, पळस्पे प्रत्येकी तीन, मोर्बे दोन, शिवकर दोन, सुकापुर, वहाळा, कोपर, दंदरे, कोन, नितलस, चिंचपाडा, चिंधरण, वावंजे आणि बामणडोंगरीयेथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. शनिवारी 38 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ग्रामीणमध्ये 1153 पॉझिटिव्ह रुग्ण झाले असून 714 जणांनी कोरोनावर मात केली असून 30 जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईत 253 जण कोरोनाबधित
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत शनिवारी (दि. 11) 253 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला त्यामुळे कोरोना बधितांची एकूण संख्या आठ हजार 9132 झाली आहे. तर 167 जण कोरोनामुक्त झाल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या पाच हजार 452 झाली आहे. शनिवारी आठ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 292 झाली आहे.
नवी मुंबईत सद्य स्थितीत नवी मुंबईत तीन हजार 388 रुग्ण उपचार घेत आहेत. नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 25, नेरुळ 34, वाशी 25, तुर्भे 24, कोपरखैरणे 47, घणसोली 46, ऐरोली 47 व दिघा पाच असा समावेश आहे.
मोहोपाड्यात 11 नवे रुग्ण
मोहोपाडा : प्रतिनिधी – वासांबे (मोहोपाडा) हद्दित शनिवारी नवीन 11 रुग्ण आढळले असून एकूण कोरोना रुग्ण संख्येने शंभरी पार केली आहे. एकूण रुग्ण संख्या 105 झाली आहे. तर मोहोपाडा येथील एका नामांकित डॉक्टरने कोरोनावर मात केली आहे.
आढळलेल्या रुग्णांमध्ये रिस बालाजी गार्डन चार, रिस नवीन वसाहत तीन, नवीन पोसरी तीन, तळेगाव एक असा समावेश आहे. तर बरे होऊन डिस्चार्ज दिलेल्या व्यक्तीची संख्या 26 झाली आहे.
महाडमध्ये दोघांना लागण
महाड : प्रतिनिधी – महाडमध्ये शनिवारी दोन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे, तर एक रुग्ण उपचारादरम्यान बरा झाला आहे.
आढळलेल्या रुग्णांत अप्परतुडील या गावातील एक 70 वर्षीय पुरुष आणि भिवघर बिरवाडी येथील 50 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. आजपर्यंत 39 रुग्णांवर उपचार सुरू असून, 54 रुग्ण बरे झाले आहेत. तालुक्यात एकुण 102 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
उरणमध्ये 30 जणांना कोरोना; आठ रुग्णांना डिस्चार्ज
उरण : वार्ताहर – उरण तालुक्यामध्ये शनिवारी (दि. 11) कोरोनाचे 30 नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्ण 468 झाले आहेत. तर आठ रुग्णांना डिस्चार्ज दिल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या 282 झाली आहे.
आढळलेल्या रुग्णांमध्ये उरण सहा, बोकडवीरा (द्रोणागिरी) चार, चिर्ले, म्हातवली, जांभूळपाडा, जासई येथे प्रत्येकी दोन, आवरे, जसखार, जेएनपीटी, करंजा, बोकडवीरा, विंधणे, चिरनेर, चाणजे, नवीन शेवा, ओएनजीसी, वेश्वी, सोनारी येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तर बरे झालेल्या रुग्णांत जेएनपीटी दोन, सोनारी दोन, बोकडवीरा, म्हातवली, चाणजे, वेश्वी येथील प्रत्येकी एक आहे. तालुक्यातील 176 रुग्ण उपचार घेत असून 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कर्जतमध्ये 15 कोरोना पॉझिटिव्ह
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार – कर्जत तालुक्यात शनिवारी एका राजकीय पक्षाच्या तालुकाध्यक्ष आणि दुसर्या एका पक्षाच्या तालुका चिटणीस व सरपंचासह 15 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून तालुक्यात आजपर्यंत 241 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातील एका रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 10 वर पोहचली आहे.
आढळलेल्या रुग्णांत कडाव येथील 60 वर्षीय व्यक्ती, शहरातील दहिवली कोंकण आळीमधील एका कुटुंबातील तीन महिला, गुंडगे भागातील एसटी स्टॅड जवळील एका इमारतीत राहणारा 30 वर्षीय युवक, नेरळ नजीकच्या कोल्हारे येथील एक महिला, तसेच नेरळ मधील 43 वर्षीय युवक, नेरळ मधीलच महेश टॉकीज नजीक राहणारा एक 30 वर्षीय युवक, गौरकामत गावातील एका 80 वर्षीय वृद्ध, लाखरण गावातील 32 वर्षीय तरुण, बार्डी येथील 37 वर्षीय व्यक्ती, कर्जत शहरातील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश आहे.