नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने लॉकडाऊनमध्ये सात दिवसांची वाढ केली आहे. त्यानुसार 13 तारखेच्या माध्यरात्रीपासून 19 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. पूर्वीप्रमाणेच अत्यावश्यक सेवेत मोडणारे एपीएमसी मार्केट व एमआयडीसी सुरू राहणार आहे.
गेले तीन दिवस पालिका क्षेत्रातील रुग्णस संख्येत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे आयुक्तांनी अधिक कठोर उपाययोजना राबवण्याचे आदेश पालिकेला दिले होते. त्यात काही बेशिस्त नागरिकांकडून जवळपास लाखांचा दंड देखील वसूल केला होता. नागरिक एकाबाजूने लॉकडाऊनला कंटाळलेले आहेत, तर दुसरीकडे नागरिकांना पोटापाण्याचा प्रश्न सतावतो आहे. तसेच गेले तीन महिने राबत असलेली पोलीस यंत्रणा देखील थकलेली असल्याने हतबल झाली आहे. त्यामुळे नागरिकांना स्वतःला स्वयंशिस्तिचे प्रदर्शन दाखवून संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहर सुरक्षित ठेवण्यास मदत करावी लागणार आहे.