माणगाव ः प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटकाळात समाजासाठी झटणारे वाहतूक पोलीस, लोणेरे विद्यापीठातील कर्मचारी व गोरेगाव येथील महिला पोलिसांना माणगावमधील मुभा रुरल डेव्हलपमेंट अॅण्ड एज्युकेशन सामाजिक संस्थेमार्फत मदतीचा हात देण्यात आला. संस्थेचे सहसंस्थापक सुशील कदम यांच्या हस्ते व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र म्हस्के, शिवम कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर माणगावचे संस्थापक भालचंद्र खाडे, लोणेरे विद्यापीठाचे प्रा. लिंगायत, प्रा. दाभाडे व संस्थेच्या अन्य पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुरक्षित अंतर ठेवून कर्मचार्यांना रेनकोट, मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
माणगाव, लोणेरेतील वाहतूक पोलिसांना रेनकोट, सॅनिटायझर, गोरेगाव पोलीस ठाण्यातील महिला पोलिसांना मास्क, सॅनिटायझर, रेनकोट तसेच लोणेरे विद्यापीठातील कर्मचार्यांना रेनकोट, सॅनिटायझरचे वाटप नुकतेच सुशील कदम व सहकार्यांनी केले.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …