पनवेल : रायगड जिल्ह्यात आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधिक 432 रुग्णांची रविवारी
(दि. 12) नोंद झाली असून, सात जणांचा बळी गेला आहे. दुसरीकडे 174 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 194 (महापालिका हद्द 154, ग्रामीण 40), पेण 67, अलिबाग 37, रोहा 27, खालापूर 25, माणगाव 21, म्हसळा 15, कर्जत 14, श्रीवर्धन व महाड प्रत्येकी 11 आणि उरण तालुक्यातील 10 रुग्णांचा समावेश आहे, तर मृत रुग्ण पनवेल व पेण तालुक्यातील प्रत्येकी दोन आणि कर्जत, रोहा व म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी एक असे आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता 7714वर पोहचला असून, मृतांची संख्या 212 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4291 रुग्ण बरे झाले असल्याने सध्या 3260 सक्रिय रुग्ण आहेत.