Breaking News

रोहा तालुक्यात कोरोनाचा फैलाव

दोन दिवसांत 40 पॉझिटिव्ह; पाच जणांची संसर्गावर मात

रोहे ः प्रतिनिधी – रोहा तालुक्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. शहरासह ग्रामीण भागात रोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. सोमवारी (दि. 13) 13 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी दिली. त्यामुळे रोहा तालुक्यात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 106वर पोहचली आहे. सोमवारी पाच व्यक्ती कोरोनावर मात करून घरी परतल्या आहेत.

रोहा शहरासह ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अनेक उपाययोजना करूनही कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नाही. सुरुवातीला मुंबईकर, त्यानंतर कामगार व आता तालुक्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण आढळत असून महिलांसह वयोवृद्ध व लहान मुलेही कोरोना संसर्गाने बाधित होत आहेत. परिणामी झपाट्याने वाढणार्‍या कोरोना रुग्णांमुळे रोहेकरांची चिंता वाढली आहे.रोहा तालुक्यात रविवारी 27 कोरोना रुग्ण आढळल्यानंतर सोमवारी पुन्हा 13 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. मागील दोन दिवसांत 40 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

आतापर्यंत रोह्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 280वर पोहचली आहे. सोमवारी पाच व्यक्ती कोरोनावर मात करून बरे होत घरी आल्याने रोहा तालुक्यात बरे होणार्‍यांची संख्या 171 इतकी झाली आहे, तर आतापर्यंत तिघांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

सोमवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये आठ महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. शहरात सात, तर ग्रामीण भागात सहा रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागातील सर्व कोरोनाबाधित वरसे ग्रामपंचायत हद्दीतील आहेत. सोमवारच्या कोरोनाबाधितांमध्ये तीन मुले आणि दोन वयोवृद्धांचा समावेश आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply