कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यातील क्रिकेटपटूंचा सहभाग असलेल्या नेरळ परिसर क्रिकेट लीग (एनपीपीएल)ला बुधवार (दि. 3)पासून सुरुवात झाली. उल्हास नदीच्या तिरावर असलेल्या भाकरीचा पाडा येथील मैदानावर 20 व्यावसायिक संघांमध्ये पाच दिवस हा थरार रंगणार आहे.
कर्जत तालुक्याच्या 150 गावे आणि आदिवासी पाड्यांतील खेळाडू एनपीपीएलमध्ये आपले क्रीडा कसब दाखवत आहेत. स्पर्धेत भरत इलेव्हन, श्रीयोग इलेव्हन, एमकेएसपी इलेव्हन, दक्ष इलेव्हन, बादशाह इलेव्हन, एमएम टायगर कशेळे, भूषण इलेव्हन, ऋषी इलेव्हन, युवराज वॉरियर्स, नाइट रायडर्स, रुद्र, सायली इलेव्हन, रोशन इलेव्हन, वसीम इलेव्हन, गुरू इलेव्हन, एसडी इलेव्हन, नेरळ वॉरियर्स, एव्ही इलेव्हन आदी 20 संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे यू ट्यूबवरून थेट प्रक्षेपण केले जात आहे.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper