एकाचा मृत्यू; 230 रुग्णांची कोरोनावर मात
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 17) कोरोनाचे 179 नवीन रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 230 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत पुन्हा विक्रमी वाढ झाली आहे. दिवसभरात 145 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 184 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 34 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून 46 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात 145 नवीन रुग्ण आढळले. पनवेल महापालिका क्षेत्रात पनवेल साईबाबा मंदिराजवळील एका व्यक्तींचा मृत्यू झाला. आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 23 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 782 झाली आहे. कामोठेमध्ये 17 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 972 झाली आहे. खारघरमध्ये 37 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 912 झाली आहे.
नवीन पनवेलमध्ये 36 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 740 झाली आहे. पनवेलमध्ये 25 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 939 झाली आहे. तळोजामध्ये सात नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 269 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 4614 रुग्ण झाले असून 3074 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 66.62 टक्के आहे. 1432 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 108 जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीणमध्ये आढळलेल्या रुग्णांत उलवे सहा, आदई तीन, गव्हाण तीन, बोर्ले, पाले बुद्रुक, उसर्ली येथे प्रत्येकी दोन, बेलवली, भोकरपाडा, चिखले, डेरवली, दुंदरे, गुळसुंदे, कोळखे, कोप्रोली, लाडीवली, पोयंजे, रिटघर, वाजे, वाकडी, वारदोली, वावंजे, सुकापूर येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात 1461 रुग्ण झाले असून 947 जणांनी कोरोनावर मात केली असून 30 जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईत 240 जणांना लागण; आठ रुग्णांचा मृत्यू
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईत शुक्रवारी 240 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोरोना बधितांची एकूण संख्या 10 हजार 786 झाली आहे. तर 212 जण कोरोनामुक्त झाल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या सहा हजार 732 झाली असून नवी मुंबईचा रिकव्हरी रेट 62 टक्क्यांवर स्थिरावला आहे. शुक्रवारी आठ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 330 झाली आहे.
नवी मुंबईत आतापर्यंत 28 हजार 265 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 17 हजार 078 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. सद्य स्थितीत नवी मुंबईत तीन हजार 724 रुग्ण उपचार घेत आहेत. आढळलेल्या रुग्णांची नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 26, नेरुळ 41, वाशी 26, तुर्भे 32, कोपरखैरणे 43, घणसोली 35, ऐरोली 31 व दिघा 6 असा समावेश आहे.