Breaking News

खारघर ‘रोटरी मिडटाऊन‘चे विविध उपक्रम

पनवेल : वार्ताहर

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रत्येकाने आपली काळजी घेणे गरजेचे झाले आहे. मास्क वापरणे, सॅनिटायझरने वेळोवेळी हात साफ करणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यावश्यक आहे. रोटरी खारघर मिडटाऊनच्या वतीने या महामारीच्या काळात अनेक चांगले उपक्रम राबविले गेले. गरजुंना अन्नधान्याचे मोफत वाटप केले. यात रोजच्या वस्तूंचा समावेश होता.

सॅनिटायझर आणि मास्कचे सिडको ऑफिस कर्मचारी खारघर, पोलीस स्टेशन खारघर, पोस्ट ऑफिस कर्मचारी, पनवेल महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी तसेच आयटिएम महाविद्यालयाचे सुरक्षा कर्मचारी यांना वाटप करण्यात आले. एकुण  1200 मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच रोडपाली पोलिस सेंट साठी फिल्टर देऊन पोलिसांच्यासाठी शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय केली. त्याचप्रमाणे एकट्या राहणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना बाहेर जाणे आवघड झाले आहे तेव्हा त्यांना हवे असणारी औषधे व जीवनावश्यक वस्तु रोटरीयननी स्वतः घरपोच पुरवल्या. कोरोनाशी सामना करताना काय खबरदारी घ्यावी, रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी किंवा कोरोनावर काय उपचार केले जातात याविषयी मार्गदर्शन करणारे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. अमित पारसनिस यांचे व्याख्यान झूम मिटवर आयोजित करण्यात आले. तसेच या महामारीच्या काळात आपली अविरत सेवा पुरविणार्‍या खारघर आणि नवी मुंबईतील 25 डॉक्टरांचा ऑनलाइन सत्कार करुन त्यांच्या सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त केली.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply