Breaking News

कोरोनाग्रस्तांसाठी भाजप सरसावला

आमदार मंदा म्हात्रे यांच्या निधीतून नवी मुंबई पालिकेला तीन रुग्णवाहिका सुपूर्द

नवी मुंबई : बातमीदार – संपूर्ण जगात कोरोना व्हायरस आजाराने थैमान घातले असताना कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नवी मुंबईतील नागरिकांना रुग्णवाहिकांची कमतरता भासू नये, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आमदार निधीतून तीन सुसज्ज अशा सर्व सुविधांयुक्त रुग्णवाहिका नवी मुंबई महानगरपालिकेला देण्यात आल्या. 

या रुग्णवाहिका या कार्डियाक रुग्णवाहिका असून त्यात ऑक्सिजन सुविधा, बेसिक इंजेक्शन, स्ट्रेचर, प्राथमिक उपचार, फायर सिस्टम, इमर्जन्सी रिस्पॉन्स फ्लॅशिंग लाईट अशा आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर व नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी सभापती संपत शेवाळे, महामंत्री विजय घाटे, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, अशोक गुरखे, सुनील पाटील, दीपक पवार, दत्ता घंगाळे, भरत जाधव , राजू तिकोणे, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त नितीन काळे, आरोग्य अधिकारी डॉ. सोनावणे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णवाहिका तसेच व्हेंटीलेटरची अतिशय कमतरता होती. तसेच खाजगी रुग्णवाहिकांचे चालक अवाढव्य रक्कम सांगून लुटालुटीचे प्रकार सुरु आहेत. खाजगी रुग्णवाहिकांच्या मालकांची मुजोरी पाहता तसेच रुग्णवाहिकांची वाढती मागणी लक्षात घेता माझ्या आमदार निधीतून सर्व सुविधांयुक्त अशा तीन रुग्णवाहिका वैद्यकीय सेवेकरिता उपलब्ध करून दिल्या आहेत.

यापूर्वीही माझ्या आमदार निधीतून तीन रुग्णवाहिका महापालिका हॉस्पिटलसाठी देण्यात आल्या आहेत. माझ्या मतदारसंघातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देणे तसेच त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी हे माझे प्रथम कर्तव्य असून 50 लाख रुपये रुग्णवाहिकांसाठी तसेच 50 लाख रुपये व्हेंटीलेटरकरिता आमदार निधीतून देण्यात आले आहेत. लवकरच वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी व्हेंटीलेटरही उपलब्ध होणार असल्याचे

त्या म्हणाल्या.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply