पनवेल ः रामप्रहर वृत्त
आपल्या देशाच्या अस्मितेवर प्रहार करण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल, तर त्यांना क्षमा करायची नाही अशी भूमिका घेणारे खंबीर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने आपल्याला मिळाले आहे याचा अभिमान आहे, असे उद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्यात काढले. त्याचप्रमाणे ज्यांनी ज्यांनी भाजपचा झेंडा दिमाखात फडकत राहावा यासाठी प्रयत्न केले अशा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
पनवेल शहर मंडळातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात गुरुवारी (दि. 22) झाला. या मेळाव्यास आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत प्रभावीपणे काम करणार्या बूथ अध्यक्षांचा या वेळी सन्मान करण्यात आला तसेच पनवेल शहर मंडळातील नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
या मेळाव्याला भाजप जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, माजी नगरसेवक अनिल भगत, गणेश कडू, राजू सोनी, माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज-म्हात्रे, सारिका भगत, डॉ. सुरेखा मोहकर, हेमलता म्हात्रे, विनायक मुंबईकर, भाजप पनवेल मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्ष रूचिता लोंढे, युवा मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहर सरचिटणीस अमित ओझे, रूपेश नागवेकर, केदार भगत, अभिषेक पटवर्धन आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …
RamPrahar – The Panvel Daily Paper