
पनवेल : रामप्रहर वृत
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधत रायगड जिल्ह्यात स्मशानभूमी स्वच्छता अभियानाचे आयोजन केले गेले होते. प्रतिष्ठानच्या वतीने विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येत असते, पण रविवारी मात्र श्रीसदस्यांनी रायगड जिल्ह्यात स्मशानभूमीची स्वच्छता करीत समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या अभियानात पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, आसूडगाव, धाकटा खांदा, आदई, आकुर्ली, सुकापूर, देवद, ऊसर्ली खुर्द, विचुंबे, पळस्पे, नांदगाव, वडघर, करंजाडे, चिंचपाङा, कोल्ही, कोपर, पारगाव, दापोली, डुंगी, ओवळे, कुंडेवहाळ, भंगारपाडा, भिंगारी, मोसारे, पाटनोली, माणघर, नानोशी आदी ठिकाणांहून सुमारे 1203 श्रीसदस्य सहभागी झाले होते. अभियानात 27465 किलो कचरा गोळा करण्यात आला.