आदिवासी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
पाली ः प्रतिनिधी
कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळ पाली, संचालित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा पडसरे शाळेचा दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. यातील एकूण चार विद्यार्थी विशेष श्रेणीत, तर 28 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक गुणावत्तेबरोबरच क्रीडा व विविधांगी क्षेत्रातही अग्रेसर आहेत. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या देदीप्यमान यशाने सुधागड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
आश्रमशाळेतील दहावीतील 48 पैकी 48 विद्यार्थी उत्तीण झाले. यापैकी 25 मुले व 23 मुलींनी बाजी मारली आहे. धनंजय पाटील 80.60 टक्के, रवींद्र हंबीर 79.60 टक्के, नेहा जाधव 78.20 टक्के, ललिता बांगारे 75.40 टक्के, आकाश शिद 74.40 टक्के, गीता दोरे 74.40 टक्के यांनी विशेष यश संपादन केले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थी व शिक्षकांचे संस्थेचे संचालक रवींद्र लिमये, प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, माध्यमिक मुख्याध्यापक संदीप शिंदे व प्राथमिक मुख्याध्यापिका मीनाक्षी ढोपे यांनी अभिनंदन केले आहे.
नांदगाव हायस्कूलचा निकाल 94.34 टक्के
मुरूड ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च 2020मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या शालांत परीक्षेचा श्री. छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतनगर, नांदगाव हायस्कूलचा निकाल 94.34 टक्के लागला आहे. शाळेतून वैष्णवी सानप ही विद्यार्थिनी 91.60 टक्के गुण मिळवून प्रथम आली. मंजिरी तांबोळी 87.20 टक्के द्वितीय, रुतिका राऊत 86.60 टक्के तृतीय, स्वरांगी वाडकर 85 टक्के चौथी, तर ऋतुजा पवार 84.40 टक्के गुण मिळवून पाचवी आली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक चिंतामणी जोशी व सहजीवन विद्यामंडळाचे अध्यक्ष फैरोज घलटे यांनी अभिनंदन केले आहे.
अॅड. नंदा देशमुख इंग्रजी माध्यमाचे घवघवीत यश
अलिबाग ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत कोकण एज्युकेशन सोसायटीच्या अलिबाग येथील अॅड. नंदा देशमुख इंग्रजी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. शाळेचा निकाल 99.24 टक्के लागला. 133 पैकी 132 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. क्रिश घातकी 96 टक्के मिळवत पहिली, नुपूर पाटील 95.40 टक्के मिळवत द्वितीय, तर समृध्दी फडके हिने 95 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकाविला. सर्व यशस्वी विद्यार्थांचे शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन, सदस्य, मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले.
र. ना. राऊत माध्यमिक विद्यालयात मुलींची बाजी
श्रीवर्धन ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत श्रीवर्धन येथील र. ना. राऊत माध्यमिक विद्यालयाचा निकाल 97.98 टक्के लागला आहे. र. ना. राऊत विद्यालयाच्या निकालात यावेळीही मुलींनीच बाजी मारली. 95.60 टक्के गुण मिळवून रिया गायकवाड प्रथम, 93 टक्के गुण मिळवून स्नेहा चौकर द्वितीय, तर 91.80 टक्के गुण मिळवून सलोनी नांदिवकर ही विद्यार्थिनी तृतीय आली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे श्रीवर्धन तालुका शिक्षण प्रसारक व सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष अनिल भुसाणे, कार्यवाह योगेश गन्द्रे, स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष व श्रीवर्धनचे नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक तसेच मुख्याध्यापक रवींद्र ढाकणे यांनी अभिनंदन केले. द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली स्नेहा चौकर ही पत्रकार संतोष चौकर यांची
कन्या आहे.
चिंतामणराव केळकर विद्यालय 100 टक्के
अलिबाग ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत चिंतामणराव केळकर विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला. दहावीच्या परीक्षेत 100 टक्के निकाल लागण्याचे विद्यालयाचे हे सातवे वर्ष आहे.
इंग्रजी माध्यमात अनिकेत तेरेदेसाई याने प्रथम येण्याचा मान मिळविला. त्याने 96.40 टक्के गुण मिळविले. तन्वी पाटील (96 टक्के) व आर्या गुरव (94.80 टक्के) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. मराठी माध्यमात रूचा विरकुड शाळेत पहिली आली. तिने 96 टक्के गुण मिळविले. निकिता फड (90 टक्के) द्वितीय, तर चारुता कामात हिने (89.60 टक्के) तृतीय क्रमांक मिळविला. विद्यालयाचे एकूण 131 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. ते सर्व उत्तीर्ण झाले आहेत.
माणगाव तालुक्याचे धवल यश
माणगाव ः प्रतिनिधी
माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मीडियम स्कूलचा एकूण निकाल 100 टक्के लागला असून संस्कृती येलवे या विद्यार्थिनीने 91.20 टक्के गुण संपादन करून प्रथम येण्याचा मान पटकाविला. दिया महाडिक 89.40 टक्के द्वितीय, अभय जाधव 85.40 टक्के तृतीय, तर श्रावणी राजपूरकर 84.20 टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमांकाने उत्तीर्ण झाली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अॅड. राजीव साबळे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, स्कूल कमिटी चेअरमन राजन मेथा, प्राचार्या मनीषा मोरे, सर्व शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
एस. एस. निकम इंग्लिश स्कूलचा एकूण निकाल 99.2 टक्के
माणगाव एज्युकेशन ट्रस्ट संचालित एस. एस. निकम इंग्लिश स्कूलचा एकूण निकाल 99.2 टक्के लागला. विराज दोशी 96 टक्के प्रथम, सिद्धी जाधव 95.60 टक्के द्वितीय, तर लिझा कोठारी 95.40 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य सतीश बडगुजर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शरद मोरे, सर्व शिक्षकवर्ग यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदन निकम, सचिव सुभाष मेथा, सरचिटणीस अमोल कुलकर्णी, खजिनदार अमृत दोशी, शालेय समिती अध्यक्ष अॅड.प्रकाश ओक, सदस्य डॉ. केतन निकम, अॅड. राहुल ओक, संपदा कुलकर्णी, रूपा सप्रे यांनी अभिनंदन केले.
अशोकदादा साबळे विद्यालयाचा एकूण निकाल 93.60 टक्के
माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या अशोकदादा साबळे विद्यालयाचा एकूण निकाल 93.60 टक्के लागला. वेदांती महाडिक ही विद्यार्थिनी 95.20 टक्के गुण संपादन करून प्रथम आली. वेद पाटील 92.80 टक्के द्वितीय, विराज उभारे 91.20 टक्के तृतीय, सुजल खरंगटे 91 टक्के चतुर्थ, तर सानिया चव्हाण 90.40 टक्के गुण मिळवत पाचवी आली.