Breaking News

चिंताजनक! रायगडात तब्बल 20 रुग्णांचा मृत्यू; 391 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 30) 20 रुग्णांचा मृत्यू झाला असून 391 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 164, ग्रामीण 46) तालुक्यात 210, पेण 39, खालापूर 32, उरण 24, अलिबाग, माणगाव व रोह्यात प्रत्येकी 17 तर कर्जत व महाड प्रत्येकी 15, सुधागड व श्रीवर्धन प्रत्येकी दोन तसेच मुरूडमध्ये एकाचा समावेश आहे, तर मृत रुग्ण पनवेल सात, पेण चार, खालापूर तीन, अलिबाग व महाड येथे दोन तर कर्जत व रोह्यात एका रुग्णाचा समावेश आहे. दुसरीकडे दिवसभरात 480 रुग्ण बरे झाले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 15328 वर पोहचला असून, मृतांची संख्या 407 इतकी झाली आहे. जिल्ह्यात 11088 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने सध्या 3368 सक्रिय रुग्ण आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply