तेलंगणा : वृत्तसंस्था
मद्य मिळत नसल्याने सॅनिटायझर प्यायल्याने नऊ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशात घडली आहे. यातील तिघांचा गुरुवारी, तर इतर सहा जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला.
मद्याची दुकाने बंद असल्याने संबंधित व्यक्तींनी सॅनिटायझर पिण्यास सुरुवात केली होती. मृतांमधील तिघे भिकारी आहेत. अशा प्रकारे किती घटना घडल्या आहेत त्याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यासोबत फक्त सॅनिटायझर प्यायल्यानेच या लोकांचा मृत्यू झाला आहे की यात आणखी काही केमिकल मिसळण्यात आले होते का, याचीही तपासणी केली जाणार आहे.