Friday , September 29 2023
Breaking News

उरणमध्ये विद्युत डीपीला आग

उरण : बातमीदार उरण शहरातील आनंदनगर कॉर्नर येथील लिबर्टी पार्क (सोसायटी)जवळील महावितरण कंपनीच्या एका डीपीला मंगळवारी (दि. 26) सकाळी अचानक आग लागली. डीपीवर वाढलेली झाडेझुडपे व कचर्‍यामुळे ही लागल्याची प्राथमिक माहिती आहे. डीपीला आग लागल्याचे समजताच आजुबाजूच्या जागरूक नागरिकांनी महावितरण, अग्निशमन दल, उरण नगर परिषदेशी संपर्क साधला. त्यानुसार सिडको व ओएनजीसीचे अग्निशमन दल, उरण नगर परिषदेचे नगरसेवक राजेश ठाकूर घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच आग आटोक्यात आणली गेली. सुदैवाने या घटनेत कोणतेही हानी झाली नाही, मात्र या घटनेमुळे उघड्या व दुर्लक्षित डीपींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply