Saturday , June 3 2023
Breaking News

पंजाबची राजस्थानवर मात

बटलर ठरला अश्विनचा अजब बळी

जयपूर : वृत्तसंस्था

आयपीएल 12च्या साखळी लढतीत राजस्थान रॉयलने किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर 14 धावांनी विजय मिळविला. पंजाबचा तडाखेबाज सलामीवीर ख्रिस गेल सामनावीर ठरला.

सवाई मानसिंग मैदानावर झालेल्या या सामन्यात पंजाबने दिलेले 185 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान संघाची सुरुवात चांगली झाली. जॉस बटलर आणि अजिंक्य रहाणे यांनी संयमी फलंदाजी केली. संघाची 78 धावसंख्या असताना अजिंक्य रहाणे 27 धावांवर बाद झाला. दुसर्‍या बाजूने बटलर खिंड लढवत असताना पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने त्याला अजब धावचित केले. राजस्थान हा सामना सहजगत्या जिंकेल, असे वाटत असताना बटलर बाद झाल्यावर पंजाबने सामन्यात कमबॅक करीत राजस्थानचे महत्त्वाचे गडी टिपले. बटलरने 69 धावा केल्या. नियमित अंतरावर गडी बाद होत राहिल्याने घरच्या मैदानावर दृष्टिपथात असलेला विजय राजस्थानचा संघ साध्य करू शकला नाही आणि पंजाबने राजस्थानवर मात केली.

तत्पूर्वी, फलंदाजी करणार्‍या पंजाबने 20 षटकांत 184 धावा केल्या. भारतीय संघाकडून चांगली कामगिरी करू न शकणार्‍या लोकेश राहुलला आयपीएलमध्येही सूर गवसला नाही. राहुलने केवळ 4 धावा केल्या. धवल कुलकर्णीने त्याचा बळी टिपत राजस्थानला पहिले यश मिळवून दिले, मात्र दुसरा सलामीवीर ख्रिस गेल याने झंझावती खेळी करीत 79 धावा फटकावल्या. मयंक अग्रवालने आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न केला, पण तो 22 धावांवर बाद झाला. गेलच्या तडाखेबाज खेळीनंतर पंजाब धावांचा डोंगर उभारेल, असे वाटत होते, मात्र ते दोनशेचा टप्पा गाठू शकले नाहीत.

Check Also

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …

Leave a Reply