Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दापोलीत इमारत बांधकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

दापोली येथे चामुंडा कंन्सट्रक्शनच्या माध्यमातून स्कायलाईन ही इमारत उभारण्यात येणार आहे. या नुतन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 8) झाले.

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्राहकाला घरा सकट समाधान मिळवून देण्याची आपल्यावर जबाबदारी आहे. ती मिळवून देण्यात तुम्ही निश्चीतपणाने यशस्वी व्हाल, अशा शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला पनवेलचे नगरसेवक मनोहर म्हात्रे,  भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, नवी मुंबईचे नगरसेवक शिवराम पाटील, बिल्डर संदीप पाटील, बाबुभाई मुनानी, सुहास गोवारी, मोहन नाईक, सुनील पाटील, महादेव गडगे, संदेश नाईक, हितेश नाईक, प्रितम नाईक, शेखर नाईक आदी उपस्थित होते.

Check Also

‘रयत‌’च्या शाखाप्रमुखांची सहविचार सभा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले मार्गदर्शन; गुणवंत शिक्षकांचा सत्कार पनवेल ः रामप्रहर वृत्तआपले कामकाज वेळच्या …

Leave a Reply