Breaking News

सर्वांचीच भाजपला पसंती अभिनेत्री; जयाप्रदा यांचा पक्षप्रवेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे. समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी मंगळवारी (दि. 26) भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात जयाप्रदा यांनी ‘कमळ’ हाती घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया या वेळी त्यांनी दिली.

जयाप्रदा या समाजवादी पक्षातून दोन वेळा खासदार झाल्या होत्या. उत्तर प्रदेशातील रामपूर येथून त्या दोनदा निवडून आल्या होत्या. अमर सिंह आणि आजम खान यांच्याशी मतभेद झाल्यानंतर जयाप्रदा यांनी 2014मध्ये राष्ट्रीय लोक दलामध्ये (आरएलडी) प्रवेश केला होता. त्यांनी आरएलडीच्या तिकिटावर बिजनौरमधून निवडणूकही लढवली, मात्र त्या पराभूत झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मंगळवारी भाजपमध्ये राष्ट्रीय महासचिव भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

भाजपकडून जयाप्रदा यांना रामपूरमधूनच तिकीट देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खंबीर नेतृत्व देशाला मिळाल्यामुळेच भाजपमध्ये प्रवेश करीत आहे, असे जयाप्रदा यांनी या वेळी सांगितले.

भाजपकडून 39 उमेदवारांची यादी जाहीर

नवी दिल्ली : भाजपने मंगळवारी (दि. 26) 39 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये उत्तर प्रदेशातील 29 आणि पश्चिम बंगालच्या 10 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपने यूपीतून मनेका गांधी, वरुण गांधी, रिटा बहुगुणा आणि जयाप्रदा यांना उमेदवारी दिली आहे. मनेका गांधी या सुल्तानपूर आणि वरुण गांधी पीलीभीतमधून निवडणूक लढवणार आहेत. अलाहाबादमधून रिटा बहुगुणा जोशी उमेदवार असतील; तर जयाप्रदा या रामपूर मतदारसंघातून पुन्हा मैदानात उतरल्या आहेत. कानपूरमधून ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी यांच्या जागी सत्यदेव पचौरी यांना संधी देण्यात आली आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply