नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 40 स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह अन्य बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.
भाजपने पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली. या यादीत गृहमंत्री राजनाथ सिंह, डॉ. महेंद्रनाथ पांडेय, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, दिनेश शर्मा, लोकसभा निवडणुकीचे प्रभारी जे. पी. नड्डा, राष्ट्रीय महामंत्री संघटन रामलाल, सुनील बन्सल, कलराज मिश्र, डॉ. लक्ष्मीकांत बाजपेयी, नितीन गडकरी, अरुण जेटली, सुषमा स्वराज, थावरचंद गेहलोत यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
स्टार प्रचारकांच्या यादीत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, स्मृती इराणी, उमा भारती, मुख्तार अब्बास नक्वी, हेमा मालिनी, सत्पाल महाराज, त्रिवेंद्र सिंह रावत, दुष्यंत गौतम आणि दिल्ली भाजपचे प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी यांच्यासह संजीव बालियान, श्रीकांत शर्मा, स्वामी प्रसाद मौर्य, चेतन चौहान, धर्मसिंह सैनी, भूपेंद्र सिंह चौधरी, सुरेश राणा, अश्विनी त्यागी, रजनीकांत माहेश्वरी, अजय कुमार आणि भवानी सिंह यांचीही नावे आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मे महिन्याच्या मध्यापर्यंत मोदी-शाह हे दोघे देशभरात अनुक्रमे 125 आणि 150 सभा घेणार आहेत. या दोघांच्या प्रचाराचे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे.