Breaking News

उरणमध्ये आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत राज्य सरकारचा निषेध

उरण : वार्ताहर
उरण तालुका भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील गणपती चौक मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष रवी भोईर यांनी महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करून मंदिरे उघडण्याची मागणी केली.
या आंदोलनात आमदार महेश बालदी, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्यासह शहराध्यक्ष कौशिक शहा, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शेखर पाटील, महिला शहराध्यक्ष संपदा थळी, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, ज्येष्ठ नेते राजा पडते, चंद्रकांत गायकवाड, रोहन भोईर, मुकेश घरत, हितेश शाह, मनन पटेल, अजित भिंडे, मनोज म्हात्रे, विक्रम ठाकूर, वेश्वी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य अजित पाटील, माजी सरपंच गौरव कोळी, निलेश पाटील, कुणाल समेळ, सुंदरलाल प्रजापती, कुंदप सौरभ, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यातील पक्षाच्या गावागावांतील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्यांनीही आपापल्या गाव परिसरात मंदिरे उघडण्याची मागणी घंटानाद आंदोलनाच्या माध्यमातून केली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply