बालासोर : वृत्तसंस्था
ओडिशामधील बालासोर येथील अब्दुल कलाम टेस्टिंग रेंजवर सोमवारी (दि. 7) भारताने स्वबळावर विकसित केलेल्या हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी घेतली. या स्वदेशी टेक्नोलॉजीमुळे
हवेत ध्वनिच्या वेगापेक्षा सहापट अधिक वेगाने लक्ष्याच्या दिशेने झेपावणारे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे.
हायपरसॉनिक टेस्ट डेमॉनस्ट्रेटर व्हेइकल (एचएसटीडीडीव्ही)ची ही चाचणी होती. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ)ने हे व्हेइकल विकसित केले आहे. त्यासाठी अग्नी मिसाइलचा बूस्टर म्हणून वापर करण्यात आला. डीआरडीओचे प्रमुख सतीश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हायपरसोनिक मिसाइल टीमने ही चाचणी केली.
हायपरसॉनिक शस्त्राचा निश्चित मार्ग नसतो. त्यामुळे शत्रूला हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या मार्गाचा अंदाज लावता येत नाही. याचा वेग इतका प्रचंड असतो की शत्रूला कळण्याआधी लक्ष्यावर प्रहार झालेला असेल. म्हणजेच सोप्या शब्दात शत्रूचे हवाई सुरक्षा कवच भेदता येते.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …