Breaking News

तांबडी बुद्रूकच्या पीडित कुटुंबीयांना न्याय द्या!

पंचक्रोशीतील लोक एकटवले

रोहा : प्रतिनिधी
तांबडी बुद्रुक येथे 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी मराठा क्रांती मोर्चा तसेच भालगाव, घोसाळा, वाली, विरझोली, तांबडी पंचक्रोशीतील सर्व समाजबांधव सोमवारी
(दि. 7) तांबडी बुद्रुक येथे एकवटले. या वेळी प्रांताधिकारी यशवंत माने व पोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.
तांबडी बुद्रुक प्रकरणाची योग्य ती तपासणी करून खर्‍या आरोपींना अटक करावी, 60 दिवसांत चार्जशीट दाखल करावे, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, या खटल्यासाठी  विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी,  आरोपींना फाशीची शिक्षा करून त्याची अंमलबजावणी त्वरित करावे, पीडित कुटुंबीयांना आर्थिक  मदत करावी, त्यांच्या घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत सामावून घ्यावे, अशा घटनांविरोधात कडक कायदा करावा तसेच आमच्या मागण्या ऐकण्यासाठी व आमच्या तीव्र भावना व रोष समरजून घेण्यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांची दोन आठवड्यांत भेट घडवून आणावी याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी माने व पोलीस उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी देण्यात आले .
या वेळी विभागातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध समाजांतील समाजबांधव आणि ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply