Breaking News

चक्रीवादळात नुकसान झालेल्या साई विद्यालयास आर्थिक मदत

माणगाव : प्रतिनिधी – माणगाव तालुक्यातील साई पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य ज्ञानदीप विद्यामंदिरचे 3 जूनच्या निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या शाळेला पूर्वपदावर आणण्यासाठी समाजसेवक कृष्णाजी महाडिक यांनी मुंबईतील सुमन रमेश तुलसी चरिटेबल ट्रस्टकडून एक लाख 65 हजार रुपये मिळवून दिले. या निधीतून विद्यालयाची दुरुस्ती करण्यात आली आहे.

यानिमित्ताने समाजसेवक कृष्णाजी महाडीक यांनी विघालयाला भेट दिली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष गजानन अधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील, संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने महाडीक आणि सुमन रमेश तुलसीयानी ट्रस्टचे आभार मानण्यात आले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply