Breaking News

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज अलिबागेत

अलिबाग : लोकसभेच्या तिसर्‍या टप्प्यातील निवडणुकीसाठी रायगड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवार (दि. 28)पासून सुरुवात होत असून, शिवसेना, भाजप व मित्रपक्ष युतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार अनंत गीते यांनी पहिल्याच दिवशी मुहूर्त साधला आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गीते आपला अर्ज दाखल करणार आहेत.

या वेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, रामदास कदम, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार भरत गोगावले यांच्यासह युतीचे इतर नेते, पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता अनंत गीते आपला अर्ज दाखल करतील. त्यानंतर कुरूळ येथील माळी समाज सभागृहात युतीचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठीचे रायगडचे रण गुरुवारपासून खर्‍या अर्थाने तापायला सुरुवात होणार आहे.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply