Breaking News

पेंधरमध्ये घर कोसळून मुलीचा मृत्यू, तिघे जखमी

पनवेल ः वार्ताहर

पनवेल तालुक्यातील पेंधर येथील एक घर कोसळून त्यामध्ये राहत असलेल्या भाडेकरूच्या 11 वर्षीय मुलीचा मृत्यू, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 8) सकाळी घडली. तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या पेंधर येथे एक जुने राहते घर सकाळी 7च्या सुमारास कोसळले. या घरात मुन्नार हरिजन व त्यांचे कुटुंबीय भाड्याने राहत होते. या दुर्घटनेत घरात झोपलेली हिना मुन्नार हरिजन (11) या मुलीचा मृत्यू झाला, तर हंसिका, अनपण व संतोष हे जखमी झाले आहेत. त्यांना श्री साई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply