कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील कडाव येथील शेतकर्यांच्या खुराड्यात असलेल्या गावठी कोंबड्या गायब होत आहेत. याबाबत त्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार देऊन कोंबडीचोरांना पकडण्याची मागणी केली आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात, पण अशाच प्रकारे शेतीला पूरक जोडधंदा करणारे कडाव येथील शेतकरी व माजी सरपंच फुलाजी पवार आणि पांडुरंग दळवी सध्या कोंबडीचोरांमुळे त्रस्त आहेत. मागील आठ दिवसांत या दोन शेतकर्यांच्या सुमारे शंभर ते दीडशे कोंबड्या-कोंबडे चोरांनी रात्रीच्या वेळेस खुराड्यातून चोरून नेऊन फस्त केल्या. गावठी कोंबड्यांना बाजारात प्रत्येकी 400-500 रुपये भाव मिळतो, मात्र त्यांची चोरी होत असल्याने विविध संकटांनी आधीच हैराण झालेल्या शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या संदर्भात दोन्ही शेतकर्यांनी कडावचे पोलीस पाटील रमेश दामू पवाळी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली तसेच कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …