Breaking News

मराठा समाजाला शिक्षण व रोजगारासाठी सवलती द्या

चंद्रकांत पाटील यांची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत   राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण व रोजगारासाठी आरक्षित घटकांप्रमाणे सवलती द्याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करून मराठा आरक्षण लागू करण्यास कालावधी लागत असताना भाजप सरकारने शिक्षण व रोजगारासाठी विविध सवलती दिल्या, पण भाजप सरकारच्या सारथीसारख्या अनेक उपक्रमांमध्ये नव्या सरकारने अडथळे निर्माण केले आणि आर्थिक तरतूद रोखून संकटे निर्माण केली आहेत. महाविकास आघाडी सरकारने ताबडतोब आपली भूमिका बदलून मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी पावले टाकली पाहिजेत. भाजप सरकारने  मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण दिले होते. त्याचे लाभही मिळायला लागले होते, मात्र सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा विषय गेल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने ढिलाई केली आणि आरक्षणाला स्थगिती आली, असा आरोप करीत आता सर्वोच्च
न्यायालयात कधी निकाल लागेल व पुन्हा आरक्षण लागू होईल याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षणासाठी व रोजगारासाठी सवलती देऊन आरक्षणासारखा लाभ दिला पाहिजे.
भाजप सरकारने मराठा समाजाला अशा सवलती दिल्या होत्या. मराठा समाजाच्या व्यवसाय व उद्योगाकरिता सुरू केलेल्या संस्थेचे संपूर्ण कामकाज महाविकास आघाडी सरकारने ठप्प केले आहे. आमच्या सरकारने 13 उपक्रम सुरु केले होते व अत्यंत जोमाने काम चालू होते ते सर्व बंद केले आहेत तसेच सारथीची स्वायत्तता काढण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने आपली भूमिका बदलून मराठा समाजाला पाठबळ द्यावे, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply