Breaking News

पोलादपूर तालुक्यात पाणीटंचाई

टँकरची थकित बिले दोन दिवसांत मिळणार

पोलादपूर : प्रतिनिधी

तालुक्यातील पाणीपुरवठा आराखड्याला मंजूरी देण्यासाठी प्रयत्न सुरू असताना सद्यस्थितीत दोन गांवे आणि 11 वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच येत्या दोन दिवसांमध्ये  गेल्या वर्षीची टंचाई निवारणाची बिले अदा केली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.

 पोलादपूर तालुक्यातील क्षेत्रपाल, तुटवली ही दोन गांवे आणि कालवली गावातील पवारवाडी, भोसलेवाडी, विठ्ठलवाडी, बौध्दवाडी, पाटीलवाडी, मोहल्ला, परसुले धनगरवाडी, क्षेत्रपाल आमलेवाडी, तुटवली धनगरवाडी,  गलतीची वाडी, ओंबळी धनगरवाडी अशा एकूण अकरा वाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून तेथे पाणीपुरवठा करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूरीसाठी  रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती पंचायत समितीच्या पाणीपुरवठा, बांधकाम व आरोग्य विभागाचे अभियंता कांबळे यांनी दिली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply