Thursday , March 23 2023
Breaking News

बारावीनंतरचे करिअर घडविण्यासाठी

सर्वसाधारणपणे विज्ञान शाखेत बारावी करणारे विद्यार्थी हे मेडिकल आणि इंजिनिअरिंगची निवड करतात. अशी काही मुले असतात की त्यांना हे दोन्ही क्षेत्र नको असतात, मात्र त्यांना अन्य पर्याय दिसत नसल्याने ते गोंधळलेले असतात. प्रत्यक्षात विज्ञान ही मोठी आणि व्यापक शाखा आहे. या ठिकाणी विज्ञान शाखेतील अन्य पर्यायांची माहिती देता येईल, जेणेकरून करिअरला पूरक ठरू शकेल. नॅनो-टेक्नॉलॉजी : सध्या नॅनो टेक्नोलॉजी इंडस्ट्रीचा चांगले दिवस आहेत. आगामी काळात या क्षेत्रात लाखो प्रोफेशनल्सची गरज भासणार आहे. बारावीनंतर नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये बीएससी किंवा बीटेक आणि त्यानंतर याच विषयात एमएससी किंवा एमटेक करून चांगले करिअर करू शकतो. स्पेस सायन्स : हे एक व्यापक क्षेत्र आहे. यांतर्गत कॉस्मोलॉजी, स्टेलर सायन्स, प्लॅनटेरी सायन्स, अ‍ॅस्ट्रोनॉमीसारख्या अनेक शाखा येतात. यात तीन वर्षांचे बीएससी आणि चार वर्षांचे बीटेकपासून पीएच.डी.पर्यंत अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हे अभ्यासक्रम इस्त्रो संस्थेत शिकवले जातात.अ‍ॅस्ट्रो-फिजिक्स : जर आपल्याला अंतराळाची, अवकाशाची आवड असेल, तर बारावीनंतर अ‍ॅस्ट्रो फिजिक्समध्ये करिअर करू शकता. यासाठी आपल्याला पाच वर्षांचा रिसर्च ओरिएंटेड प्रोग्रॅम आणि चार किंवा तीन वर्षांच्या बॅचलर प्रोग्रॅमला प्रवेश घ्यावा लागेल. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंंतर अंतराळ संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ होऊ शकता. पर्यावरण विज्ञान : या शाखेत पर्यावरण आणि मानवी व्यवहारावर होणार्‍या परिणामाचा अभ्यास केला जातो. यानुसार इकोलॉजी, डिजास्टर मॅनेजमेंट, वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट, पोल्युशन कंट्रोलसारख्या विषयाचे अध्ययन केले जाते. वॉटर सायन्स : पाण्याशी निगडित शास्त्र विषय आहे. यात हायड्रोमिटियोरोलॉजी, हायड्रोजिओलॉजी, ड्रेनेज बेसिन मॅनेजमेंट, वॉटर क्वालिटी मॅनेजमेंट, हायड्रोइंफॉर्मेटिक्ससारख्या विषयाचा अभ्यास करावा लागतो. आपत्ती व्यवस्थापनामध्ये अशा पदवीधरांना चांगली मागणी आहे. मायक्रोबायोलॉजी : या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी आपल्याला बीएससी इन लाईफ सायन्स किंवा बीएससी इन मायक्रोबायोलॉजी करावे लागेल. यानंतर आपण मास्टर पदवी आणि पीएच.डी. देखील मिळवू शकता. याशिवाय पॅरामेडिकल, मरीन बायोलॉजी, बिहेव्हियरल सायन्स, फिशरीज सायन्स यासारखे अनेक क्षेत्र करिअरसाठी उपलब्ध आहेत. डेअरी सायन्स : दुग्धजन्य पदार्थ उत्पादनाच्या क्षेत्रात भारताची जगात आघाडी आहे. भारताचा नंबर अमेरिकेनंतर लागतो. डेअरी टेक्नॉलॉजी किंवा डेअरी सायन्स अंतर्गत मिल्क प्रॉडक्शन, प्रोसेसिंग, पॅकेजिंग, स्टोरेज आणि डिस्ट्रीब्युशनची माहिती दिली जाते. त्यामुळे या क्षेत्रात प्रशिक्षित उमेदवारांची मागणी वाढत चालली आहे. बारावीनंतर प्रवेश परीक्षा दिल्यानंतर चार वर्षांचा डेअरी टेक्नोलॉजीच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकता. काही संस्था डेअरी टेक्नॉलॉजीत दोन वर्षांचा डिप्लोमा कोर्सही उपलब्ध करून देतात. रोबोटिक सायन्स : रोबोटिक सायन्स हे क्षेत्र विकसित आणि लोकप्रिय होत चालले आहे. त्याचा वापर प्रत्येक क्षेत्रांत होत आहे. जसे की हार्ट सर्जरी, कार असेम्बलिंग, लँडमाईन्स आदी.

-विजयालक्ष्मी साळवी, पुणे

चीप डिझायनर होण्यासाठी

सध्याच्या वाढत्या तंत्रज्ञानाने माणसाचे जीवन आधुनिक झाले आहे. याच वाढत्या टेक्नॉलॉजीमुळे वेगवेगळ्या क्षेत्रात करिअरच्या अनेक चांगल्या संधीही उपलब्ध होत आहेत. या तंत्रज्ञानात चीप डिझायनिंग इंडस्ट्रीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. म्हणूनच त्यात करिअर करणं हा अर्थातच चांगला ऑप्शन आहे.इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्याची आवड आहे…? आव्हानात्मक काम पेलण्याची तयारी आहे…? मग तुमच्यासाठी चीप डिझायनिंग हा एक उत्तम पर्याय आहे चीप सिलिकॉनचा एक छोटा पातळ तुकडा मशीनच्या इंटिग्रेटेड सर्किट बेसचे काम करत असतो, मात्र चीप डिझायनर त्याच्या मदतीने मोठ्या आकारातील उपकरणांनाही छोट्या आकारात बदलतो. म्हणूनच चीप डिझायनरची मागणी सध्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वाढत आहे. चीप डिझायनरचे मुख्य काम म्हणजे छोट्या किंवा मोठ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची कार्यक्षमता वाढवून ती वापरण्यास सुलभ बनवणे. टीव्ही रिमोट, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, ऑटोमोबाईल सेक्टर या सर्व क्षेत्रांमध्ये चीपचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. या इंडस्ट्रीमध्ये डिझाईन इंजिनिअर, प्रॉडक्ट इंजिनिअर, टेस्ट इंजिनिअर, सिस्टिम्स इंजिनिअर, प्रोसेस इंजिनिअर, पॅकेजिंग इंजिनिअर, सीएडी इंजिनिअर आदी स्वरूपात काम करता येऊ शकते. तुम्हाला काय यायला हवं? चीप डिझायनिंगमध्ये करिअर करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स टेली कम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये बीई किंवा बीटेकची पदवी मिळवलेली असावी. चीप डिझायनिंगमध्ये विशेषतः डिझाईन, प्रॉडक्शन, टेस्टिंग, अ‍ॅप्लिकेशन्स आणि प्रोसेस इंजिनियरिंगचा समावेश असतो.

या क्षेत्रासाठी काही संस्थांमध्ये शॉर्ट टर्म कोर्सेसही उपलब्ध आहेत. ज्यांचा संबंध हा आयसी, सर्किट डिझाईन आणि माइक्रो प्रोसेसशी असतो. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी काही आवश्यक कौशल्ये असणे गरजेचे आहे. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे विशेष ज्ञान असावे. त्याशिवाय उत्तम संवाद कौशल्य, टीम वर्क, समस्या सोडविण्याची क्षमता, तसेच प्रोग्रॅमिंग आणि मॅथॅमॅटिकल कौशल्य यांसारख्या गोष्टींची आवश्कता असते. टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटस् आणि आधुनिक इनोव्हेेशनचे विशेष ज्ञान असणे आवश्यक आहे. कुठे शिकाल हा कोर्स? काही प्रमुख संस्थांमध्ये या क्षेत्राशी निगडित कोर्सेस चालवले जातात. त्यामध्ये बिटमॅपर इंटिग्रेेशन टेक्नॉलॉजी पुणे, सेंट्रल फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स कॉम्प्युटिंग, बेंगळूर, जामिया मिलीया इस्लामिया, नवी दिल्ली या त्यातील काही प्रमुख संस्था आहेत.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply