मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शनिवारी (दि. 8) अखेर नवी नियमावली जारी करीत कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत नाईट कर्फ्यू लागू असणार आहे. पर्यटनस्थळे, स्विमिंग पूल जिम, स्पा, मैदाने, उद्याने बंद ठेवण्यात येणार आहेत. शाळा-महाविद्यालये 15 फेबु्रवारीपर्यंत बंद असतील. सरकारी व खाजगी कार्यालये, सलूनमध्ये 50 टक्के क्षमतेचे बंधन आहे. सिनेमागृह, नाट्यगृह तसेच हॉटेल रात्री 10पर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. दोन डोस पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घेता येणार. खासगी कंपन्यांतही दोन डोसशिवाय प्रवेश नसेल. लग्नासाठी 50, तर अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांनाच परवानगी आहे. नवी नियमावली रविवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. लोकलसेवेवर तूर्त कोणतीही बंधने नाहीत.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …