Breaking News

सेवा सप्ताहात समाजोपयोगी उपक्रम

कडाव ः वार्ताहर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा भाजपकडून 14 ते 20 सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण देशभरात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 17 सप्टेंबरच्या पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून देशभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.  या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 16) दुपारी कर्जत मंडल अध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या नेतृत्वाखाली कळंब येथील दोन आदिवासी वाड्यांमधील कुटुंबांतील शंभरपेक्षा अधिक आदिवासी बांधवांना फळवाटप करण्यात आले. या वेळी मंगेश म्हसकर यांच्यासह तालुका चिटणीस जीवन मोडक, अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष फुरकान कुरेशी, तालुका युवा मोर्चा सरचिटणीस राहुल बदे, ज्येष्ठ कार्यकर्ते अरविंद बदे, सलीम तांबोळी, अमजत लोगडे, अजय बदे, राजेश राणे, नितीन डुकरे, राजेश बदे आदी उपस्थित होते.

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जाताहेत. भाजपसह अनेक सामाजिक संस्था, संघटना याकामी सक्रियपणे सहकार्य करतात. कर्जत भाजपच्या माध्यमातूनही विविध उपक्रमांची रूपरेषा आखली असून या सेवा सप्ताहात त्याची अंमलबजावणी होताना दिसत आहे.

-अशोक ओसवाल, उपनगराध्यक्ष, कर्जत नगरपालिका

रोह्यात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण

धाटाव ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली रोहा तालुक्यात सेवा सप्ताह साजरा करण्यात आला. कोविडबाबत दक्षता घेत ठिकठिकाणी वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्ष लागवड, फळवाटप, स्वच्छता तसेच प्लास्टिकमुक्त अभियान राबविण्यात आले. धाटाव औद्योगिक वसाहतीमधील कंपनी परिसरासह बस स्टॉप किल्ला, धाटाव, बारसोली, सुदर्शन,  जैनवाडी, एक्सल स्टॉप, वरसे, उडदवणे येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या वेळी युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घाग, ग्रामपंचायत सदस्य राजेश डाके, विभाग अध्यक्ष कृष्णा बामणे, जिल्हा चिटणीस नरेश कोकरे, युवा नेते किरण भगत, सचिन मोरे, जिल्हा सदस्य अमरदीप म्हात्रे, शिवाजी दिवकर, सुरज मुटके, अक्षय यादव, निलेश धुमाळ, निलेश जगंम, संदेश बैकर, प्रसाद मोहिते, रितेश घाग, रोहित यादव, श्रीकांत दरडे, अरुण पडवळ, विकास बामणे आदी उपस्थित होते.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply