
नवी मुंबई : बातमीदार
बँक ऑफ इंडिया, नवी मुंबई, विभागीय कार्यालय येथे दरवर्षीप्रमाणे 15 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या काळात हिंदी महिना साजरा करण्यात आला. विभागाच्या सर्व शाखांनी दैनिक कामकाजामध्ये हिंदी भाषेचा वापर केला. सोमवारी (दि. 14) हिंदी दिवस साजरा करण्यात आला.
संस्थेचे प्रमुख विवेक प्रभु व समस्त कर्मचार्यांच्या उपस्थितीत गृहमंत्री अमित शाह, राजीव गौबा, मंत्रिमंडळ सचिव, भारत सरकार तथा बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय आणि मुख्यम कार्यकारी अधिकारी ए. के. दास यांच्या संदेशांचे वाचन करण्यात आले. विवेक प्रभु यांनी त्यांच्या भाषणामध्ये हिंदी दिवस साजरा करण्याचे महत्त्व सांगून दैनंदिन कामकाजामध्ये हिंदी शब्दांचा वापर केला पाहिजे असे सांगितले. महिनाभरात हिंदी निबंध, हिंदी सुलेख, हिंदी टंक लेखन, बॅकिंग शब्दावली, हिंदी ई-मेल स्पर्धा घेण्यात आल्या. हिंदी स्पर्धेचे विजेत्यांना पुरस्कार आणि प्रमाणपत्र देऊन सन्माानित केले. विवेक प्रभु यांनी स्पर्धेच्या विजेत्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार रमेश साखरे गच्छी, मुख्य व्यवस्थापक (राजभाषा) यांनी केले. त्यानंतर हिंदी महिना आणि हिंदी दिवसचे समाप्त घोषित करण्यात आली.