पनवेलमध्ये लागू बंधूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

85 वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर आपल्या सर्वांगसुंदर अलंकारांनी अधिराज्य गाजवणारे ज्वेलर्स लागू बंधू यांच्यातर्फे आयोजित हिरे, मोती, पोवळे, नवरत्न व सोन्याच्या हॉलमार्क प्रमाणित आकर्षक दागिन्यांच्या भव्य प्रदर्शनाचे शनिवारी (दि. 11) उद्घाटन करण्यात आले.

पनवेल हॉटेल सुरुची येथे सकाळी 11 ते रात्री 8.30 या वेळेत रविवारी (दि. 12)देखील हे प्रदर्शन असणार आहे. लिमिटेड एडिशन असलेली वैशिष्ट्यपूर्ण पोलकी ज्वेलरीदेखील या प्रदर्शनाच्या निमित्ताने लागू बंधू प्रथमच आणली आहे. या प्रदर्शनात अनेक आकर्षक वैविध्यपूर्ण दागिने येथे मिळतील. या प्रदर्शनामध्ये 50 टक्के सूट रत्नजडीत दागिन्यांच्या घडणावळीवर, 25 टक्के सूट सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर, प्रत्येक खरेदीवर गिफ्ट व्हाऊचर व 100 टक्के एक्सचेंज व्हॅलू हॉलमार्क प्रमाणित सोने व हिन्यांवर अशा आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत.

या नाविन्यपूर्ण भव्य प्रदर्शनाचा लाभ समस्त पनवेलकरांना घेता येणार असून यामध्ये ग्राहकांना या विविध ऑफर्सद्वारे आपले आवडते दागिने अत्यंत वाजवी दरात खरेदी करायची सुवर्णसंधीदेखील मिळत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या भव्य आणि वैविध्यपूर्ण प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन लागू बंधू मोतीवाले यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Check Also

Пинко казино: Азартные игры или развлечение?

Пинко казино: Азартные игры или развлечение? Вопрос о том, является ли Пинко казино азартной игрой …

Leave a Reply