Breaking News

रायगडात 615 नवे पॉझिटिव्ह; 16 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात 615 नव्या कोरोना रुग्णांची आणि 16 रुग्णांच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी (दि. 18) झाली, तर दिवसभरात 790 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 290, पेण 78, अलिबाग 56, कर्जत व महाड प्रत्येकी 34, खालापूर 30, रोहा 26, माणगाव 24, पोलादपूर 18, तळा सात, उरण पाच, श्रीवर्धन व म्हसळा प्रत्येकी चार, मुरूड तीन आणि सुधागड तालुक्यातील दोघांचा समावेश आहे; तर मयत रुग्ण रोहा तालुक्यात चार, पनवेल व कर्जत प्रत्येकी तीन, पेण दोन आणि उरण, खालापूर, सुधागड व पोलादपूर प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 40403 व मृतांची संख्या 1084 झाली आहे. जिल्ह्यात 33,249 जण कोरोनामुक्त झाल्याने 6070 विद्यमान रुग्ण आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply