Breaking News

ऐतिहासिक कृषी विधेयके अखेर राज्यसभेतही मंजूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही कृषीविषयक विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. या वेळी विरोधकांकडून सभागृहात विधेयकांचा विरोध करीत गोंधळ घालण्यात आला, मात्र आवाजी मतदान घेत शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी या दोन विधेयकांना मंजुरी देण्यात आली.  केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी राज्यसभेत कृषीविषयक विधेयके मांडली. हे दोन्ही कायदे ऐतिहासिक असून, शेतकर्‍यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणतील. शेतकरी त्यांचा शेतमाल देशभरात कुठेही मुक्तपणे विकू शकतील. मी शेतकर्‍यांना आश्वासित करतो की, ही विधेयके एमएसपीशी संबंधित नाहीत, असे तोमर यांनी या वेळी सांगितले.

एमएसपी व्यवस्था कायम राहणार : पंतप्रधान मोदी

विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शेतकर्‍यांना एमएसपी व्यवस्था कायम राहणार असल्याची ग्वाही दिली. सरकारी खरेदी कायम असेल. आम्ही अन्नदात्यांसाठी शक्य होईल तितके प्रयत्न करू आणि त्यांच्या येणार्‍या पिढ्यांचे जगणे अधिक सुखकर करू, असे त्यांनी म्हटले आहे.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply