मुंबई : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळ माथेरान येथील विविध समस्यांच्या सोडवणुकीबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 6) मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक झाली.
या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, संबंधित विभागाचे अधिकारी, माथेरानचे माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, भाजप माथेरान शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ, उपाध्यक्ष किरण चौधरी, राजेश चौधरी, माजी नगरसेवक संदीप कदम, सुनील शिंदे, शकील पटेल, रूपेश गायकवाड, मिलिंद कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
माथेरानच्या विकासासाठी रोप वे, फ्युनिक्यूलर रेल्वे, पायवाट व्यवस्थापन, वस्तू वाहतूक, पर्यटक सुविधा, कायदेशीर मदत इत्यादी बाबींवर राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. त्या अनुषंगाने ही बैठक सकारात्मक झाली.
Check Also
खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …
RamPrahar – The Panvel Daily Paper