Breaking News

अलिबागच्या कोविड रुग्णालयाचे काम कूर्मगतीने

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 42 हजारांच्या पुढे गेली आहे. ही बाब लक्षात घेऊन अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात 100 खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंतररुग्ण विभागातील दुसर्‍या मजल्यावर हे कोविड रुग्णालय उभारण्यात येत आहे, मात्र रुग्णालय उभारणीचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचे हाल होत आहे.
रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 42 हजारांवर पोहोचला आहे, तर 1104 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. जिल्ह्यात सध्या सुमारे पाच हजारहून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 100 खाटांचे सुसज्ज कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. यात 50 खाटांसाठी कृत्रिम श्वासोच्छवास उपकरणांची व्यवस्था, तर सर्व खाटांसाठी प्राणवायू सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र प्राणवायू प्रकल्पही उभारला जाणार आहे, मात्र रुग्णालय उभारण्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे रुग्णांची कुचंबणा होत आहे.

कोविड रुग्णालयाचे काम सुरू आहे. लवकरच ते पूर्ण होईल. शासनाच्या नवीन निकषांनुसार आरोग्य कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी तिथे काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोविड कक्षात व्हायरल लोड जास्त असतो. तो कमी करण्यासाठी निगेटिव्ह प्रेशर सुविधा कार्यान्वित करणे आवश्यक आहे तसेच अन्य काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर रुग्णालय सुरू करण्यात येईल.
-डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकीत्सक, रायगड 

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply