Breaking News

पालिका प्रशासनाच्या ताफ्यात सुरक्षा रक्षक

खारघर ः प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिका प्रशासनाच्या ताफ्यात सोमवारी (दि. 21) 10 सुरक्षा रक्षक दाखल झाले आहेत. खासगी सुरक्षा एजन्सीच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात ही भरती करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या पथकात हे सुरक्षा रक्षक कार्यरत असणार आहेत. कोरोनाच्या काळात आरोग्य विभागाच्या माध्यमातून मास्क न घालणे तसेच शासनाने घालून दिलेले नियम न पाळणार्‍या नागरिकांवर पालिका कारवाई करते. या कारवाईदरम्यान दंड ठोठवताना काही नागरिक अधिकारी व कर्मचार्‍यांशी वाद घालतात.अनेक वेळा हा वाद पोलीस ठाण्यापर्यंतही पोहचतो. कारवाईदरम्यान वाद निर्माण झाल्यास कर्मचारी व अधिकार्‍यांच्या सुरक्षेसाठी सैनिक या सुरक्षा एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply