![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2020/09/Kharghar-BJP-1024x480.jpg)
खारघर ः रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्ष उमाताई खापरे यांच्या सूचनेनुसार व आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी कोविड सेंटरमध्ये महिलांवर होणार्या आत्याचाराविरोधात भारतीय जनता पक्ष महिला मोर्चातर्फे खारघर येथे आंदोलन करण्यात आले. कोरोनाचे सर्व नियम पाळून खारघर येथील पोलीस ठाण्यात खारघर तळोजा मंडळाच्या अध्यक्ष वनिताताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राज्य करणार्या राज्यकर्त्यांच्या राज्यात कोरोनासारख्या महामारीच्या काळात कोविड सेंटरमध्येसुध्दा महिला सुरक्षित नाहीत. मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असता आजतागायत त्यावर काहीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे आजचे हे राज्यव्यापी आंदोलन करावे लागले. यापुढील काळात तरी राज्य सरकारला जाग येऊन महिला सुरक्षेबद्दल उपाययोजना केल्या जातील, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली.
या वेळी खारघर येथील पदाधिकारी उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष अॅड. संध्या शारबिद्रे, उत्तर रायगड जिल्हा चिटणीस गीता चौधरी, खारघर मंडळ उपाध्यक्ष निशा सिंग, खारघर मंडळ महिला मोर्चा उपाध्यक्ष प्रतीक्षा कदम, सोशल मीडिया जिल्हा संयोजिका मोना अडवाणी, मधुमिता जाना, राजश्री नायडू, श्यामला आदी उपस्थित होत्या.