पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात 333 नव्या कोरोना रुग्णांची आणि 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद सोमवारी (दि. 28) झाली, तर दिवसभरात 534 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 247, अलिबाग 26, कर्जत 15, पेण 13, उरण नऊ, खालापूर व रोहा प्रत्येकी सात, माणगाव पाच, श्रीवर्धन दोन आणि सुधागड व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे; तर मयत रुग्ण पनवेल तालुक्यात पाच, उरण दोन आणि खालापूर, कर्जत, पेण, अलिबाग व सुधागड तालुक्यात प्रत्येकी एक असे आहेत.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 45 हजार 877 आणि मृतांची संख्या 1232 झाली आहे. जिल्ह्यात 40 हजार 285 जण कोरोनामुक्त झाल्याने 4360 विद्यमान रुग्ण असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper