Breaking News

राष्ट्रीय हॉकी अजिंक्यपद खो-खो स्पर्धा महाराष्ट्राला दुहेरी मुकुट

मुंबई : प्रतिनिधी

जयपूर येथील चौगन स्टेडियमवर रंगलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने दुहेरी विजेतेपदाला गवसणी घातली. महाराष्ट्राच्या पुरुषांनी भारतीय रेल्वेला; तर महिलांनी भारतीय विमानतळ प्राधिकरण संघाला पराभूत करीत विजेतेपद मिळवले. पुण्याचे प्रतीक वाईकर व काजल भोर अनुक्रमे प्रतिष्ठेच्या एकलव्य व राणी लक्ष्मीबाई पुरस्काराचे मानकरी ठरले.

पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने गतविजेत्या रेल्वेवर 21-20 असा एका गुणाने निसटता विजय मिळवला. महाराष्ट्राच्या विजयात सुरेश सावंत (0.40, 1.30 मि. व 3 गडी), प्रतिक वाईकर (1.20, 1.30 मि. व 2 गडी) आणि अनिकेत पोटे (3 गडी) यांनी मोलाची भूमिका बजावली. विलास कारंडे (1.60, 1.20 मि.), अमित पाटील (1.10 मि. व 4 गडी) यांनी रेल्वेचे जेतेपद टिकवण्यासाठी कडवा संघर्ष केला. त्यापूर्वी उपांत्य सामन्यात महाराष्ट्राने केरळला; तर रेल्वेने कोल्हापूरला नमवून अंतिम फेरी गाठली होती. महिला गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने विमानतळ प्राधिकरण संघावर 13-12 अशी अवघ्या एका गुणाच्या फरकाने मात केली. महाराष्ट्रासाठी प्रियंका भोपी (2.20, 1.20 मि.), काजल भोर (1.30, 1.10 मि. व 3 गडी) आणि अपेक्षा सुतार (2.35, 2.50 मि.) यांनी अप्रतिम कामगिरी केली. पौर्णिमा सकपाळ (2.20, 2.30 मि. व 1 गडी), ऐश्वर्या सावंत (2.50, 2.35) यांनी कडवी झुंज देऊनही प्राधिकरण संघाला विजयाने थोडक्यात हुलकावणी दिली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply