Breaking News

जागतिक पर्यटन दिनानिमित्त वृक्षारोपण

कर्जत ः बातमीदार

जागतिक पर्यटनदिनानिमित्त येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टमधील पर्यटकांनी वृक्षारोपण केले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माथेरानमधील रिसॉर्ट व्यवस्थापनाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथे एमटीडीसीच्या रिसॉर्टमधील व्यवस्थापक अमोल भारती यांनी रिसॉर्टमधील पर्यटकांना जागतिक पर्यटन दिनाचे महत्त्व पटवून देऊन जास्तीत जास्त पर्यटकांनी उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत रिसॉर्टमधील सर्व पर्यटकांनी 25 रोपट्यांचे रोपण केले.

आवारात असलेल्या झाडावर झाडाचे नाव व वैशिष्ट्य याचे फलक लावल्याने पर्यटनाबरोबरच येथील झाडांची इत्थंभूत माहिती पर्यटकांना मिळणार आहे, असे येथील व्यवस्थापक अमोल भारती यांनी सांगितले, तर वृक्षारोपण केलेल्या झाडाला पाहण्यासाठी आम्ही दरवर्षी माथेरानला येणार, असे पर्यटकांकडून सांगण्यात आले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply