Breaking News

नवी मुंबईने ओलांडला 36 हजार रुग्णसंख्येचा टप्पा

नवी मुंबई : बातमीदार

कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्यामुळे प्रशासनासमोर चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या 36 हजार पार झाली असून, आतापर्यंत शहरात  एकूण 36 हजार 257 कोरोनाबधित आढळले आहेत. मंगळवारी (दि. 29) शहरात 323 नवे कोरोनाबधित रुग्ण आढळले आहेत. तर, शहरात कोरोनामुक्तीचा दर 88 टक्क्यांवर पोहचला आहे. शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. वाढत्या संसर्गामुळे शहरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 36 हजारांच्या पुढे गेली आहे. तर, शहरात सहा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या 746 वर पोहचली आहे. शहरात तीन हजार 487 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एकूण एक लाख 93 हजार 240 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून कोरोनामुक्तीचा दर वाढला आहे. तर शहरातील मृत्युदरही कमी झाला आहे.

नवी मुंबईमध्ये गणेशोत्सवानंतरच्या काळात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली असली,तरी कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्याही अधित आहे. नवी मुंबईचा रिकव्हरी रेट 88 टक्क्यांवर स्थिरावला आहे. नवी मुंबईच्या आठही विभागांत मिळून दिवसभरात दोन हजार 172 रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या असून, रॅपिड अँटिजेन टेस्टची संख्या एक लाख 19 हजार 240 झाली आहे. एकूण आरटीपीसीआर टेस्ट केलेल्यांची संख्या 74 हजार 687 झाली असून कोविड टेस्ट केलेल्यांची एकूण संख्या एक लाख 93 हजार 927 झाली आहे.

Check Also

Positive aspekte Bei Freispielen Frei Einzahlung Fur Bestandskunden Freispiele exklusive Einzahlung vorschlag je Bestandskunden enorme Vorteile

Welche vertiefen auf keinen fall doch nachfolgende Spielerbindung, zugunsten offenstehen zweite geige zusatzliche Wege, abzuglich …

Leave a Reply