Breaking News

आशिया कपसाठी नवी मुंबईत फुटबॉल क्रीडांगण सज्ज

नवी मुंबई ः बातमीदार

17 वर्षाखालील महिला अशियाई फुटबॉल करंडक स्पर्धा 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. या स्पर्धेच्या शुभारंभाचा आणि अंतिम सामना नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. याशिवाय स्पर्धेचे सराव सामने नवी मुंबई महापालिकेच्या नेरूळ येथील डॉ. यशवंतराव चव्हाण फुटबॉल मैदानामध्ये होणार आहेत. या निमित्ताने आयुक्तांनी मैदानाच्या तयारीची पाहणी केली.

यापूर्वीही सन 2017मध्ये फिफा 17 वर्षाखालील पुरुष विश्वचषक स्पर्धेचे काही सामने नवी मुंबईत खेळविण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा आशियाई स्पर्धेच्या निमित्ताने नवी मुंबई यजमानपद भूषवित आहे. पुढील महिन्यात होणार्‍या 17 वर्षाखालील महिला आशियाई फुटबॉल करंडक स्पर्धेच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगणाची व तेथील सुविधांची महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकार्‍यांसह पाहणी केली व आवश्यक त्या सूचना केल्या.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी बैठका

महायुतीच्या नेत्यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Leave a Reply